हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
  • 2014
    एच.बी.पी.सी.एल.ने मध्यवर्ती औषध प्रयोग शाळेची (कसौली) प्रतिष्ठित प्रयोगशाळा चाचणी आणि अंशांकन यासाठी राष्ट्रीय प्रमाणपत्र मंडळ ही प्रतिष्ठित अनुज्ञप्ती प्राप्त केली.
  • 2014
    एच.बी.पी.सी.एल. ने 300 कोटी रुपयांची उलाढालीची मर्यादा पार केली आणि 2013-14 या वित्तीय वर्षासाठी 315 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक समूह उलाढालीची नोंद केली.
  • 2014
    11 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतरित्या भारत पोलिओमुक्त देश आहे असे घोषित केले. एच.बी.पी.सी.एल.ला यासंबंधी नवी दिल्लीत झालेल्या समारंभात उपस्थित रहाण्यासाठी प्रतिष्ठित आमंत्रण प्राप्त झाले.
  • 2013
    कंपनीच्या इतिहासात प्रथम एचबीपीसीएल ने200 कोटी रुपयांची समूह उलाढालीची मर्यादा ओलांडली आणि 2012-13 या वित्तीय वर्षासाठी 269 कोटी रुपये एवढ्या गट उलाढालीची नोंद केली
  • 2012 ऑक्टोबर
    भारतातुन पोलिओचे निर्मुलन करण्यात हातभार लावल्याबद्दल युनिसेफच्या संचालीका श्रीमती शानेल हॉल यांनी कौतुक केले.
  • 2012 ऑगस्ट
    एच.बी.पी.सी.एल. चे मौखिक घेण्याच्या पोलिओ विषाणु लसीच्या कार्यनिपुणता चाचणी बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आणि एन.आय.बी.एच.एस.सी. ने कौतुक केले, समाधान व्यक्त करणारे प्रमाणपत्र बहाल केले.
  • 2012 जुलै
    मध्यवर्ती औषध प्रयोगशाळा, कसौली यांनी वायुयुक्त कोथासाठी विष प्रतिकारक पदार्थाचे विमोचन करण्यासाठी (बाजारात आणण्यासाठी) प्रमाणपत्र प्रदान केले.
  • 2011 ऑगस्ट
    मौखिक घेण्याचा द्रव विभागाचे नुतणीकरण आणि आधुनिकीकरण पुर्ण झाले आणि परळ प्रघटकात उत्पादन सुरु झाले.
  • 2011-12
    जागतिक आरोग्य संघटना - c.GMP यांच्या प्रमाणपत्रनुसार बिटालॅक्टमआणि मौखिक घेण्याचे पुनस्सजलीकरण द्रावण सुविधा यांची उच्चांकी कमी वेळात उभारणी करण्यात आली आणि जळगाव प्रघटकात उत्पादने सुरु झाले.
  • 2010 जुन
    जागतिक आरोग्य संघटना - c.GMP यांचे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर पिंपरी प्रघटकात विष - प्रतिकारक पदार्थ आणि रक्तलसी उत्पादने (सर्पदंश प्रतिविष, विंचूदंश प्रतिविष, प्रतिधनुर्वात लस, प्रतिविष व रक्तजल, अॅण्टीरेबीज रक्तजल) ही सुविधा पुर्ण करण्यात आली आणि त्यानंतर उत्पादन पुन्हा सुरु झाले.