हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
  • 2010 मार्च
    संयुक्त राष्ट्र संघाच्या अभिकरणाच्या खरेदीसाठी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित या कंपनीने तयार केलेली द्वीगुणी प्रकारची 1 आणि 3 मौखिक पोलिओ लस (बीओपीव्ही 1 आणि 3) या लसीला तत्वतः स्विकारण्यात आले.
  • 2009-2010
    कंपनीने सुमारे 183 कोटी रुपये एवढ्या उच्चांकी उलाढालीची नोंद केली, हे कंपनीच्या विक्री आणि पणन यांच्या इतिहासातील महत्वाचे यश आहे. हे केवळ युनीसेफ कडुन मोठ्या प्रमाणात टीओपीव्ही आणि एमओपीव्ही 1 (पोलीओ लसी) मागण्या प्राप्त झाल्यामुळे शक्य झाले.
  • 2008
    कंपनीने सुधारीत अनुसूची Schedule “M” GMP आवश्यकता यांचे अनुपालन करण्यासाठी एच.बी.पी.सी.एल., प्रतिविष व रक्तजल विभाग पिंपरी आणि एच.ए.पी.एल., जळगाव या ठिकाणी औषध उत्पादन विभागाची सुधारणा प्रक्रिया सुरु केली. कंपनीला एमओपीव्ही 1 साठी संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमाणन प्राप्त झाले.
  • 2004
    मार्गदर्शक तत्वानुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या पूर्व पात्रतेसाठी मौखिक घेण्याच्या पोलिओ लसीच्या विभागात सुधारणा केली आणि मध्यवर्ती औषध प्रयोगशाळा कसौली यांनी अनुमती दिलेल्या विषमज्वर निर्मुलन लसीसाठी अॅसीटोनचे प्रायोगीक गट तयार केले.
  • 2001
    प्रतिविष व रक्तजल विभाग पिंपरी येथील प्रशुष्कन प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आला.
  • 2000
    रेबीजरोधी रक्तलसीचे उत्पादन पुन्हा सुरु झाले.
  • 1999
    मौखिक पोलीओ लसीची युनिसेफ कडुन मागणी प्राप्त झाली.
  • 1999
    मौखिक पोलीओ लसीच्या उत्पादन सुविधेच्या प्रमाणपत्रासाठी जागतिक आरोग्य संघटना - जीएमपी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरु झाली.
  • 1999
    पिंपरी येथे घोड्याच्या लिदी पासुन गांडुळखत तयार करण्याचे काम सुरु झाले.
  • 1998
    पिंपरी येथे प्रशुष्कन प्रकल्प सुरु झाला.