हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

डॉ.वॉल्देमार मोर्देकाय हाफकिन यांचा जन्म 15 मार्च 1860 रोजी ओडेसा, रशिया या ठिकाणी झाला. ते डॉ. अलेक मेटचनीकोव्ह आणि डॉ. लुईस पाश्चर यांचे नामांकित शिष्य होते. पटकीच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यांचे कलकत्ता येथे आगमन झाले. त्यांनी लसीचे चिकित्सा परिक्षण केले आणि भयानक आजार आणखी फैलावू नये म्हणून चालू असलेल्या लढ्यात यशस्वी मदत केली. जेव्हा 1896 साली प्लेगचा प्रादुर्भाव झाला तेव्हा मुंबईत संशोधन प्रयोगशाळा उभारण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले.

डॉ हाफकिन यांनी सुरु केलेल्या प्लेगच्या लसीचा वापर इतका प्रभावी होता की तेव्हा असे म्हटले जात होते की त्यांनी एकट्याने या "काळ्या मृत्युवर" मात केली

अशा तऱ्हेने हाफकिनचा इतिहास 100 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यानंतर 1925 साली या संस्थेचे हाफकिन संस्था असे नामकरण करण्यात आले. उत्पादन उपक्रमांचा विस्तार करणे आणि औषधे, जीवनदायी औषधे यांची वाढती मागणी पुर्ण करणे या उद्देशाने 1975 साली महाराष्ट्र शासनाने हाफकिन संस्थेचे दोन भागात विभाजन केले आणि उत्पादन उपक्रम हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित कडे सोपवण्यात आले, सदर कंपनी पुर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असुन तीची कंपनी अधिनियम 1956 खाली नोंदणी करण्यात आली.