उत्पादने
धनुर्वात प्रतिविष औषध
विकर परिष्कृत धोड्याच्या रक्तातील नत्रप्रचुर द्रव्याचे (ग्लोब्युलीन) द्रावण
1500 आंतरराष्ट्रीय एकके / 1 मिलीलिटर कुपी
10,000 आंतरराष्ट्रीय एकके / 3, 4 मिलीलिटर कुपी
20,000 आंतरराष्ट्रीय एकके / 5 मिलीलिटर कुपी
वेष्टन
1 मिलीलिटर कुपी x 10
1 मिलीलिटर कुपी x 100
3, 4 मिलीलिटर कुपी x 10
5 मिलीलिटर कुपी x 10
धनुर्वात विष रक्तजल आयपी (ए. टी. एस.) | ||||||||||||
|
||||||||||||
|
||||||||||||
धनुर्वात विषप्रतिकारक : | ||||||||||||
धनुर्वात प्रतिकारक घटसर्प विषाच्या साह्याने घोड्याचे अतिप्रतिक्षमन करुन तयार केले जाते. अतिप्रतिक्षमन केलेल्या घोड्यापासुन प्राप्त केलेल्या रक्तद्रवात मोठ्या प्रमाणात धनुर्वात विषाविरुध्द प्रतिपिंड असतात. हे विषप्रतिकारक म्हणजे विकर परिष्कृत शुध्दीकरण केलेले असतात आणि त्याची संहती झाली असते. धनुर्वाताच्या कारणकारी जीव असलेल्या क्लोट्रीडियम टिटानी पासुन विमोचित झालेल्या विषाचे निष्प्रभावन करण्याची विनिर्दिष्ट शक्ती विषप्रतिकारकमध्ये असते. |
||||||||||||
प्रतिबंधक वापर : | ||||||||||||
धनुर्वात विषप्रतिकारकाची 1500 आंतरराष्ट्रीय एकके रक्तजलाची संवेदिता चाचणी झाल्यानंतर अधस्त्वच्या किंवा स्नायुअंतर्गत मार्गाने दिली जातात (घोड्याच्या रक्तजलाच्या प्रतिक्रिया खाली बघा). सदर विषप्रतिकारक धनुर्वात प्रवण जखम झाल्यानंतर लगेच देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, माती, घाण यांनी दूषित झालेली जखम, विषप्रतिकारकाच्या प्रतिबंधक इंजेक्शन व्यतिरिक्त जखमेवर योग्य प्रतिजैविकाच्या साह्याने पुरेसे शल्य उपचार करणे आवश्यक आहे. जर रुग्ण रक्तजलाला संवेदनक्षम असेल किंवा पुर्वी त्याचे धनुर्वाताच्या लसीने (अधिशोषित) सक्रिय प्रतिक्षमन झाले असेल तर रुग्णाने केवळ धनुर्वाताच्या लसीची (अधिशोषित) मात्रा प्राप्त करणे आवश्यक आहे, धनुर्वात विष प्रतिकारकाची नव्हे. विष प्रतिकारकाचा वापर केल्याने केवळ 1 ते 3 आठवडे संरक्षण प्राप्त होते. धनुर्वात लस प्रदिर्घ काळ प्रतिक्षमता देते आणि ती स्वस्त असुन जवळ जवळ कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. म्हणुनच धनुर्वात विष प्रतिकारकाची प्रतिबंधक मात्रा देण्यासमवेत सक्रिय प्रतिक्षमता सुरु करावी असा सल्ला दिला जातो. हे सर्व करण्यासाठी त्याचवेळी दुसज्या दंडात 0.5 मिलीलिटर धनुर्वात लस (अधिशोषित) दिली जाते (टेट / वॅक / पी. टी. ए. पी.) कारक अधिशोषित धनुर्वात लस धनुर्वाताविरुध्द धनुर्वात विष प्रतिकारका समवेत सक्रिय प्रतिक्षमता मिर्माण करु शकते (बी. जे. वकील आणि इतर, वैद्यकीय संशोधन मासीक, 1968, खंड 56, पृष्ट 1188 - 1201) धनुर्वाताच्या अधिशोषित लसीची दुसरी 0.5 मिलीलिटर मात्रा पहिल्या लसीनंतर 1 ते 2 महिन्याने दिली जाते आणि प्रदिर्घ काळ पुरेसे संरक्षण प्राप्त करण्यासाठी 6 ते 12 महिन्यानंतर लसीची तिसरी मात्रा दिली जाते. |
||||||||||||
धनुर्वाताच्या उपचारातील वापर : | ||||||||||||
तोंड उघडता न येणे, स्नायुचे आर्कष यासारखी धनुर्वाताची लक्षणे रक्तलसीच्या विरुध्द शक्य असेल एवढी पूर्व दक्षता घेतल्यानंतर आढळल्या नंतर रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याला धनुर्वात विष प्रतिकारकाची 10000 ते 20000 आंतरराष्ट्रीय एकके देण्याची शिफारस केली जाते. आता 10000 ते 20000 एकके ही मात्रा पुरेशी समजली जाते (जे. सी. पटेल आणि इतर धनुर्वाताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे कामकाज पृष्ट 337, धनुर्वाताच्या अभ्यासाचा मुंबई गट, 1965). याशिवाय प्रतजैविके शामके, आकडीरोधी कारके, आणि स्नायु शिथीलकारी कारके यांचा समावेश असलेले लक्षणानुसारी उपचार केले जाऊ शकतात. रुग्णाचे धनुर्वात अधिशोषित लसीच्या साह्याने रुग्णालयातुन घरी सोडताना सक्रिय प्रतिक्षमन करणे आवश्यक आहे (टेट / वॅक / पी. टी. ए. पी.) आणि त्याला 1 किंवा 2 महिन्यानंतर धनुर्वाताच्या अधिशोषित लसीची दुसरी मात्रा देण्यासाठी आणि 6 ते 12 महिन्यानंतर तिसरी मात्रा देण्यासाठी रुग्णालयात परत येण्याचा सल्ला देण्यात यावा. | ||||||||||||