हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

सर्प प्रतिविष रक्तद्रव्य औषधे

प्रशुष्कित, बहुसंयुजी विकर परिष्कृत इम्युनोग्लोब्युलीन्स (घोडा)
10 मिलीलिटर इंजेक्शनसाठी असलेल्या निर्जतुक पाण्याने आय. पी. द्रावणात रुपांतर करा.
द्रावणात रुपांतर झाल्यानंतर त्यामध्ये शुध्दीकरण झालेल्या घोड्याच्या ग्लोब्युलीन्सच्या समतुल्य घटकांचा समावेश असतो.
द्रावणात रुपांतर झालेली 1 मिलीलिटर रक्तजल भारतीय नागाच्या (नाजा नाजा) 0.6 मिलीग्रॅम विषाचे, 0.45 मिलीग्रॅम सर्वसाधारण अतिविषारी सापाच्या म्हणजे क्रेटच्या विषाचे 0.6 मिलीग्रॅम रुसेल विपेर (विपेरा रुसेली) या सापाच्या विषाचे, 0.45 मिलीग्रॅम सॉ स्केल्टु वीपेर (ईशीश कॅरीनॅटस) या सापाच्या विषाचे निष्प्रभावन करते.

फेनॉल आय. पी. चा टिकवणारे कारक म्हणुन वापर केला जातो - त्याचे प्रमाण 0.25% वजन / आकारमान यापेक्षा जास्त नसते.

बहुसंयुजी सर्पविरोधी रक्तजल आय. पी. (एएसव्हीएस)  
जर विषारी सर्पाने दंश केला तर प्रशुष्कित बहुसंयुजी सर्प विषरोधी रक्तजल उपयुक्त ठरते. प्रशुष्कित स्वरुपात तुलनात्मकदृष्ट्या उच्च तपमानाला ती साठवणे शक्य आहे. द्रावणात रुपांतर केल्यानंतर ती रक्तलस म्हणजे शुध्दीकरण झालेल्या प्रतिपिंडाचे द्रावण असते, सदर प्रतिपिंडे कुपीत उपलब्ध असलेल्या घोड्याच्या रक्तापासुन तयार केली जातात. 10 मिलीलिटर द्रावणात रुपांतर करण्यासाठी इंजेक्शनसाठी असलेल्या पाण्याचा देखील वापर केला जातो.
   
10 मिलीलिटर, 1 मिलीलिटर द्रावणात रुपांतर झालेली रक्तलस 0.60 मिलीग्रॅम भारतीय नागाच्या (नाजा नाजा) प्रशुष्कित विषाचे निष्प्रभावन करते   0.45 मिलीग्रॅम सर्वसाधारण अतिविषारी सापाच्या म्हणजेच क्रेटच्या, विषाचे निष्प्रभावन करते.
 
0.60 मिलीग्रॅम रुसेल विपेर (रुसेला विपेरी) या सापाच्या विषाचे निष्प्रभावन करते  

0.45 मिलीग्रॅम सॉ स्केल्ड विपेर (इशीस कॅरीनॅटस) या सापाच्या विषाचे निष्प्रभावन करते

 
वेष्टन :  
1, 5, 10, 20 कुप्या आणि तेवढ्याच इंजेक्शनसाठी असलेल्या निर्जंतुक पाण्याचा समावेश असलेल्या कुपी.
निर्देशन :  
विषारी सापाच्या दंशावरील उपचारासाठी
मात्रा :  
सुरुवातीला 1 - 2 कुप्या नंतर विषबाधेच्या तिव्रतेनुसार प्रतिहिस्टॅमाइन्सचे रक्षण असेल तर अधिक चांगले उपचारहोऊ शकतात.
प्रतिकूल औषध प्रतिक्रिया :  
अधुन मधुन संवेदिता प्रतिक्रिया उदभवतात, तीव्र अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.
पूर्वदक्षता :  
  • जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तलस देण्यापूर्वी संवेदिता चाचणी घेणे आवश्यक आहे.
  • प्रतिहिस्टॅमाइन्स आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण माहिती.  

घोडा हा प्राणी सर्प विषरोधी कारकाचा स्त्रोत आहे आणि ते घोडा, तट्टु, खेचर यांच्या रक्तद्रवापासुन प्राप्त केले जाते. ते / परनिर्मित प्रतिक्षमता कारक म्हणुन वापरले जाते आणि ते संवेदनाक्षम व्यक्तीचे सर्पदंशापासुन रक्षण करु शकते. पुढील सर्पाच्या जातीपासुन रक्षण केले जाते.
1)भारतीय नाग (नाजा नाजा)
2) सर्वसाधारण क्रेट साप (बंगारस कॅरलस)
3) रुसेल विपेर (विपेरा रुसेली) आणि
4) सॉ स्केल्ड विपेर साप (इशीस कॅरीनॅटस). 1 मिलीलिटर द्रावणात रुपांतर झालेले सर्प विषरोधी कारक 0.6 मिलीग्रॅम भारतीय नाग/ सर्पाच्या विषाचे, 0.45 मिलीग्रॅम सर्वसाधारण क्रेट सापाच्या 0.6 मिलीग्रॅम आणि 0.45 मिलीग्रॅम रुसेल विपेर सापाच्या विषाचे निष्प्रभावन करते.

वापरासाठी निर्देश :  
अ. सर्प विषरोधी कारक पुढील प्रकारच्या सर्व दंशा पासुन रक्षण करण्यासाठी निर्देशीत केले जाते. :  


1. भारतीय नाग
2. सर्वसाधारण क्रेट साप
3. रुसेल विपेर आणि
4. सॉ स्केल्ड विपेर साप, जेव्हा रुग्ण चिकित्सालयीन खुणा आणि विषबाधेची लक्षणे दर्सवतो.

ब. सर्प विषरोधी कारक देण्यापुर्वी घ्यावयाची पूर्व दक्षता.:
  • रुग्णाच्या कुटुंबात यापुर्वी एखाद्या व्यक्तीला दमा, इसब, यासारखे विकार होते काय आणि रुग्णाला सदर औषधाची अॅलर्जी आहे काय.रुग्णाने यापुर्वी धनुर्वातरोधी रक्तजलाचे, घटसर्परोधी जलाचे यासारख्या रक्तलसीचे इंजेक्शन घेतले होते काय. रुग्णाची संवेदिता चाचणी घ्या.
  • 1 : 10 या प्रमाणात विरलन केलेली 0.1 मिलीलिटर रक्तजल अधस्त्वचा पध्दतीने रुग्णाला द्या.
  • एका जागेवर किंवा सर्वसाधारण प्रतिक्रिया होते काय हे निश्चीत करण्यासाठी रुग्णाचे 30 मिनीटे निरिक्षण करा. जर प्रतिकुल प्रतिक्रिया झाल्या नाही तर निवडलेल्या मार्गाने रुग्णाला आवश्यक मात्रा द्या.
  • प्रतिहिस्टॅमाइन्स आणि स्टीरॉइडस समवेत अॅड्रेनॅलीन (इपीनेफ्रील) 1 मिलीलिटर 1: 1000 जवळ तयार ठेवा, त्यामुळे संवेदिता प्रतिक्रिया मुळे अचानक काही गंभीर समस्या निर्माण झाली तर तिचे निराकरण करता येइल.