हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
×

कोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे

रेबीज प्रतिद्रव्य औषध

विकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील प्रतिलस नत्रप्रचुर द्रावण (इम्युनोग्लोब्युलीन)
5 मिलीलिटर क्षमता - 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर पेक्षा कमी नाही,
वेष्टन: 1, 5, 10, 20 कुप्या

रेबीजरोधी रक्तजल आयपी (एआरएस)

कुत्री, लांडगे, आणि कोल्हे यांच्या प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी उपयुक्त, ती द्रव स्वरुपात असल्याने तिची साठवण + 2 - 8 डिग्री सेल्सीअस तपमानाला करणे आवश्यक आहे. सदर रक्तजल म्हणजे घोड्याच्या रक्तापासुन तयार केलेल्या शुध्दीकरण केलेल्या प्रतिपिंडांचे द्रावण आहे.

  विकर परिष्कृत रक्तजल
प्रमाण : 5 मिलीलिटर, क्षमता 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर
वेष्टन :  

1, 5, 10, 20 कुप्या

प्रवर्ग : परनिर्मित प्रतिक्षमन कारक
निर्देशन : कुत्री, लांडगे आणि जॅकल यांच्या प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी
मात्रा :   40 आंतरराष्ट्रीय एकके / किलोग्रॅम शरिराचे वजन, स्नायुअंतर्गत किंवा अधस्त्वचा पध्दतीने दिली जाते
औषधाची प्रतिकुल प्रतिक्रिया : क्वचीत आढळणारी संवेदिता प्रतिक्रिया, अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी ताबडतोब उपचाराची गरज आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तजल देण्यापुर्वी संवेदिता चाचणी घेणे आवश्यक आहे.
पुर्वदक्षता :
  • प्रतिहिस्टॅमाईल्स आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.
रेबीजरोधी रक्तजल आयपी

विकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील नत्रप्रचुर द्रावण (इम्युनोग्लोब्युलीन) 1500 आंतरराष्ट्रीय एकके, क्षमता - 300 आंतरराष्ट्रीय एकके / मिलीलिटर पेक्षा कमी नाही.

सर्वसाधारण माहिती

घोडा रॅबीजरोधी रक्तजलाचा स्त्रोत आहे आणि सदर रक्तजला रेबीजरोधी अतिप्रतिक्षमन केलेल्या घोड्याच्या, खेचराच्या रक्तापासुन तयार केली जाते. रक्तापासुन प्राप्त केलेल्या रक्तजलाचे शुध्दीकरण केलेल्या, विकर परिष्कृत आणि संहति विनिर्दिष्ट इम्युनोग्लोब्युलीनसचा समावेश असतो. या रक्तलसीचा निष्क्रिय प्रतिक्षमन कारक म्हणुन वापर केला जातो आणि ती रॅबीज झाल्याची शंका असलेल्या व्यक्तीचे रक्षण करते.

घटक प्रमाण

प्रत्येक मिलीलिटर मध्ये विकर परिष्कृत घोड्याच्या इम्युनोग्लोब्युलीनचा समावेश असतो - 300 आंतरराष्ट्रीय एककापेक्षा कमी नाही. फेनॉल आय. पी. - 0.25% वजन / आकारमान पेक्षा जास्त नाही

औषधीय रुप

स्नायुअंतर्गत किंवा अधस्त्वचा पध्दतीने इंजेक्शन देण्यासाठी द्राव. प्रत्येक कुपीत 5.0 मिलीलिटर, 1500

आंतरराष्ट्रीय एकके.

उपचारी निर्देशन प्रवर्ग 3 दंशाच्या उपचारासाठी, जेव्हा रुग्ण खात्री पटलेल्या किंवा संशय आलेल्या रॅबीज आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात येतो तेव्हा या रक्तलसीचा वापर केला जातो. (प्रवर्ग 3 मधील दंश - डोके, चेहरा, मान किंवा बोट या अवयावरील एक किंवा अनेक मोठा पारत्वचा दंश किंवा ओरखडे). शरिरावरील कोणत्याही भागातील खोल जखमेसाठी देखील या रक्तलसीचा वापर केला जातो. लालामुळे प्रदुषित झालेले श्लेमपटल, कोल्हे आणि लांडग्यांचे सर्व प्रकारचे दंश यावरील उपचारासाठी सदर रक्तजल वापरले जाते. वर उल्लेख केलेल्या प्राण्यांचा दंश झाल्यानेतर शक्यतो लवकरात लवकर म्हणजेच 24 ते 48 तासाच्या आत सदर रक्तजल देणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये तयार प्रतिपिंडाचा समावेश असतो. प्रतिपिंड रेबीज संसर्गजन्य आजारा विरुध्द परनिर्मित प्रतिक्षमता निर्माण करतात. सदर रक्तजल शक्यतो लवकरात लवकर विशिष्ट स्थानावर देणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवान क्रिया करणाज्या विषाणुचे जलद आणि जागेवरच निष्प्रभावन होते. रॅबीजरोधी रक्तलस रॅबीजरोधी उपचाराच्या यशाची हमी देत नाही आणि नेहमीच रेबीजरोधी रक्तजल आणि रेबीजरोधी लसीकरण याचा एकत्रित वापर करणे आवश्यक आहे.

पुर्वदक्षता
सदर रक्तलसीचा रक्तलसीची अॅलर्जी असलेल्या व्यक्तीमध्ये काळजीपुर्वक वापर करणे आवश्यक आहे. अशा रुग्णाला जर अचानक अॅलर्जी प्रतिक्रिया निर्माण झाली तर उपचार करता येतील अशी वैद्यकीय दक्षता घेऊन नंतर घोड्याची रॅबीजरोधी रक्तलस दिली जाते.
प्रतिकुल परिणाम

अनेक तातडीच्या किंवा विलंबनाने अॅलर्जी प्रकाराच्या प्रतिक्रिया होतात. अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया कमी रक्तदाबासहीत , शीतपित्त, पित्त उठणे या सारख्या तातडीच्या प्रतिक्रिया आढळल्या आहेत. विलंबनाने होणाज्या प्रतिक्रियामध्ये शोध प्रतिक्रिया, ताप, किंवा पुरळ ग्रंथीचे विकार आणि संधिवेदना यांचा समावेश आहे. अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया उपचारा दरम्यान किंवा उपचारानंतर घडु शकतात, जरी अतिसंवेदिता चाचणीचे परिणाम नकारात्मक असले तरी अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया चाचणी दरम्यान देखील घडु शकतात.

रेबीजरोधी रक्तजल देण्यापुर्वी घ्यावयाच्या पूर्वदक्षता
  • दम्यासारखे विकार पूर्वी कुटुंबातील व्यक्तीला झाले होते काय ,
  • रुग्णाला इसब, औषधाची सर्व प्रकारची अॅलर्जी आहे काय
  • यापूर्वी रुग्णाने धनुर्वातरोधी रक्तजलाचे, घटसर्परोधी रक्तजलाचे, सर्प किंवा विंचू प्रतिविष रक्तजलाचे इंजेक्शन घेतले होते काय..