हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
×

कोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे

विंचू प्रतिविष रक्तद्रव्य औषधे

प्रशुष्कित, एकसंयुजी विकर परिष्कृत इम्युनोग्लोब्युलीनस (घोडा)
10 मिलीलिटर इंजेक्शनसाठी असलेल्या निर्जंतुक पाण्याने (आयपी) द्रावणात रुपांतर करा.
द्रावणात रुपांतर झाल्यानंतर त्यामध्ये शुध्दीकरण झालेल्या घोड्याच्या ग्लोब्युलीनच्या समतुल्य घटकाचा समावेश असतो.
1 मिलीलिटर द्रावणात रुपांतर झालेली रक्तलस 1.0 मिलीग्रॅम लाल विंचवाचे (युथस टॅम्युलस) विष निष्प्रभावीत करते.
फेनॉल आय. पी. टिकणारा कारक म्हणुन - 0.25% वजन / आकारमान यापेक्षा जास्त नाही

विंचू प्रतिविष प्रतिररक्तजल आय. पी.
  हे (प्रतिररक्तजल म्हणजे प्रशुष्कित एकसंयुजी प्रतिविंचुविष द्रव असुन त्याचा लाल विंचवाने (युथस टॅम्युलसने) नांगी मारलेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. सदर प्रतिरक्तजलाची सामान्य तपमानाला साठवणुक करता येते. विरलन झाल्यानंतर ती विकर संक्षेपीत परिष्कृकात प्रतिपिंडाचे द्रावण असते, सदर प्रतिपिंड घोड्याच्या रक्तापासुन तयार केले जात असुन ते कुपी मध्ये उपलब्ध आहे. प्रशिष्कित चूर्णाचे द्रावणात रुपांतर करण्यासाठी इंजेक्शनसाठी असलेल्या निर्जंतुक पाण्याचा वापर केला जातो.
द्रावणात रुपांतर झालेल्या रक्तजलाचे प्रमाण - 10 मिलीलिटर मात्रा - 1 मिलीलिटर निष्प्रभावन झालेली रक्तलस 1 मिलीग्रॅम लाल विंचवाच्या विषाचे निष्प्रभावन करते (मेझोब्युथस टॅम्युलस कोनकानेसीस, पोक्कोक)
वेष्टन :   1, 5, 10, 20 कुप्या आणि तेवढ्याच इंजेक्शनसाठी असलेल्या निर्जंतुक पाण्याचा समावेश असलेल्या कुप्या.
निर्देशन :   विंचु दंशाच्या उपचारासाठी
 मात्रा : सुरुवातीला 1 कुपी, नंतर विषबाधेची चिन्हे किती प्रमाणात कायम आहेत या घटकावर मात्रा अवलंबुन असते, प्रतिहिस्टॅमाइन्स संरक्षक कारकाचा समावेश अनिवार्य आहे.
प्रतिकूल औषध प्रतिक्रिया :  क्वचीत आढळणारी संवेदिता प्रतिष्क्रिया, तीव्र अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी तातडीने उपचाराची आवश्यकता असते.
 पूर्वदक्षता :
  • जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तलस देण्यापूर्वी संवेदिता चाचणी घेणे आवश्यक आहे.
  • प्रतिहिस्टॅमाइन्स आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे..
I. औषध उपलब्ध करुन देण्याची पध्दत
10मिलीलिटर कुपी X चा बॉक्स 1
10मिलीलिटर कुपी X चा बॉक्स 5
10मिलीलिटर कुपी X चा बॉक्स 10
10मिलीलिटर कुपी X चा बॉक्स 20
विंचू विषरोधी प्रतिरक्तजल आय. पी. प्रशुष्कित, एकसंयुजी विकर परिष्कृत इम्युनोग्लोब्युलीन्स.
अ. सर्वसाधारण माहिती
घोडा विंचू विषविरोधी कारकाचा स्त्रोत असुन तो घोड्याच्या रक्तजलापासुन प्राप्त केला जातो. यासाठी सदर प्राणी लाल विंचवाच्या (मेझोब्युथस टॅम्युलस कोनकॅनेसीस पोकॉक) विषाविरुध्द अतिक्षमित केले जातात, या पूर्वी विंचवाच्या सदर जातीला ब्युथस टॅम्युलस असे संबोधले जात होते. रक्तद्रवापासुन प्राप्त केलेल्या रक्तजलात शुध्दीकरण झालेल्या, विकर परिष्कृत आणि संहतित विनिर्दिष्ट विजातीय इम्युनोग्लोब्युलीन्सचा समावेश असतो. त्याचा परनिर्मित प्रतिक्षमन कारक म्हणुन वापर केला जातो आणि तो संवेदनाक्षम व्यक्तीची विंचवाच्या डंखापासुन रक्षण करु शकतो. (मेझोब्युथस टॅम्युलस कोनकॅनेसीस, पोकॉक). 1 मिलीलिटर द्रावणात रुपांतर केलेले विंचू विषविरोधी कारक आय. पी. 1.0 मिलीग्रॅम प्रशुष्कित लाल विंचवाच्या (मेझोब्युथस टॅम्युलस कोनकॅनेसीस, पोकॉक) विषाचे निष्प्रभावन करते.त्यामध्ये 0.25 % फेनॉल - टिकवणारा कारक म्हणुन याचा देखील समावेश असते. प्रशुष्कित विंचू प्रतिविष प्रतिरक्तजलातील आद्र्रतेचे प्रमाण 1% पेक्षा जास्त नसते.
वापरासाठी निर्देश
अ. निर्देशन :
विंचू विषविरोधी प्रतिरक्ताचा आय. पी. लाल विंचवाच्या (मेझोब्युथस टॅम्युलस कोनकॅनेसीस, पोकॉक), सर्व प्रकारच्या डंखावर उपचारासाठी वापर केला जातो. जेव्हा चिकित्सालयीन चिन्हे आणि विषबाधेची लक्षणे आढळतात तेव्हा सदर प्रतिरक्तजलाचा वापर केला जातो.
ब. विंचू विषविरोधी कारकाच्या आय. पी. वापर करण्यापुर्वी घ्यावयाची पूर्वदक्षता :
  • रुग्णाच्या कुटुंबात यापुर्वी एखाद्या व्यक्तीला दमा, इसब यासारखे विकार होते काय आणि रुग्णाला सदर औषधाची सर्व प्रकारची अॅलर्जी आहे काय. रुग्णाने यापुर्वी धनुर्वातरोधी रक्तजल, घटसर्परोधी रक्तजल, यासाऱख्या रक्तजलाचे इंजेक्शन घेतले होते काय.
  • रुग्णाची संवेदिता चाचणी घ्या. 1 : 10 या प्रमाणात विरलन केलेली 0.1 मिलीलिटर रक्तलस अधस्त्वचा पध्दतीने रुग्णाला द्या. एका जागेवर किंवा सर्वसाधारण प्रतिक्रिया होते काय हे निश्चीत करण्यासाठी रुग्णाचे 30 मिनीट निरिक्षण करा. जर प्रतिकुल प्रतिक्रिया झाल्या नाही तर इंजेक्शनच्या निवडलेल्या मार्गाने रुग्णाला आवश्यक मात्रा द्या.
  • प्रतिहिस्टॅमाइन्स आणि स्टीरॉइडस समवेत अॅड्रेनॅलीन (इपीनेफ्रील) 1 मिलीलिटर 1: 1000 जवळ तयार ठेवा, त्यामुळे संवेदिता प्रतिक्रिया मुळे अचानक काही गंभीर समस्या निर्माण झाली तर तिचे निराकरण करता येइल. रक्तजलाची संपुर्ण मात्रा दिल्यानंतर रुग्णाला किमान 30 मिनीटे निरिक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे.
  • जर रुग्ण घोड्याच्या प्रतिरक्तजल संवेदनक्षम आहे असे आढळले तर तुम्ही नियमीत आणि पुरेशा अंतराने श्रेणीबध्द मात्रा देऊन त्याची संवेदनक्षमता नष्ट करा.
  • रुग्णाची संवेदनक्षमता नष्ट करण्यापुर्वी रक्तातुन प्राप्त केलेल्या रक्तजलाचे शुध्दीकरण झालेल्या विकर परिष्कृत आणि संहतित, निनिर्दिष्ट विजातीय इम्युनोग्लोब्युलीन्सचा समावेश आहे काय हे डॉक्टरांनी निश्चीत करणे आवश्यक आहे.
क. प्रतिक्षेध
विंचू विषरोधी कारक आय. पी. देण्यासाठी ज्ञात प्रतिक्षेध नाही.
ड. प्रतिकुल औषध प्रतिक्रिया
रक्तजल विषम जातीय असल्यामुळे ती कधीकधी रुग्णामध्ये संवेदिता प्रतिक्रिया निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते. तातडीने घडणारी प्रतिक्रिया म्हणजे अपप्रतिरक्षी आघात (तातडीची अतिसंवेदिता), त्यामुळे घाम येतो.