हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम
×

कोरोना कोविड 19 आजारावर मात करण्याकरिता दान करू इच्छिणाऱ्यांकरिता हाफकीन महामंडळातील संपर्क अधिकाऱ्यांची नावे

घटसर्प प्रतिविष औषध

विकर परिष्कृत घोड्याच्या रक्तातील नत्र प्रचुर
द्रव्याचे (ग्लोब्युलीन) द्रावण 10,000 आंतरराष्ट्रीय एकके
वेष्टन : 10 मिलीलिटर कुपी x 10

घटसर्प प्रतिविष रक्तजल आय. पी. (एडीएस) - एडीएस म्हणजे शुध्द प्रतिपिंडाचे द्रावण असुन ते घोड्याच्या रक्तापासुन तयार केले जाते. ते 10 मिलीलिटर कुपी मध्ये उपलब्ध आहे.

 घटक: विकर परिष्कृत घोड्याच्या रक्तांतील नत्रप्रचुर द्रव्याचे (प्रतिविष) द्रावण 10,000 आंतरराष्ट्रीय एकके
 वेष्टन :   10 मिलीलिटर कुपी x 10
 निर्देशन : परनिर्मित प्रतिक्षमन कारक
 मात्रा : उपचारी - 10,000 ते 30,000 एकके (IU), त्यामध्ये गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांसाठी 40,000 ते 100,000 एककापर्यंत (IU) वाढ केली जाते. 30,000 एककापर्यंत मात्रा स्नायुअंतर्गत पध्दतीने दिली जाते, तथापी 30,000 एककापेक्षा जास्त मात्रा असेल तर तिचा काही भाग स्नायुअंतर्गत पध्दतीने दिला जातो आणि उर्वरित भाग 1.5 ते 2 तासानंतर शिरांतर्गत पध्दतीने दिला जातो. सदर मात्रा देताना सुरक्षेसाठी प्रतिहिस्टॅमीन देणे आवश्यक आहे.
औषधाची प्रतिकुल प्रतिक्रिया : कधीकधी संवेदी प्रतिक्रिया घडु शकते, उदाहरणार्थ - अपप्रतिरक्षी आघात, त्यासाठी त्वरीत वैद्यकीय मदत पुरवणे आवश्यक आहे.
पूर्वदक्षता:
  • शक्य असेल तेव्हा औषध देण्यापुर्वी संवेदी चाचण्या घेणे आवश्यक आहे.
  • प्रतिहिस्टॅमीन आणि अपप्रतिरक्षी आघातासाठी उपचार तयार ठेवणे आवश्यक आहे.

घटसर्प विष प्रतिकारक - घटसर्पाचे प्रतिविष घटसर्प विषाच्या साह्याने घोड्यांचे अतिप्रतिक्षमन करुन तयार केले जाते, रक्तद्रव घोड्यांचे अतिप्रतिक्षमन करुन तयार केले जाते, त्यामध्ये प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात असतात. सदर प्रतिपिंड घटसर्प विषाचा प्रतिकार करतात आणि ते विकर परिष्कृत, शुध्दीकरण केलेले असतात आणि त्यांची संहती झाली असते. घटसर्पाचा कारणकाराी जीव असलेल्या कोर्नेबॅक्टेरीयम पासुन विमोचित झालेल्या विषाचे निष्प्रभावन करण्याची विनिर्दिष्ट शक्ती विष प्रतिकारकामध्ये आहे.

प्रतिबंधक वापर :घटसर्प विष प्रतिकारकाचा प्रतिबंधक म्हणुन वापर करण्याची शिफारस केली जात नाही कारण त्याचा संरक्षक परिणाम अल्पकालीन असतो (फक्त 1 ते 2 आठवडे) आणि याशिवाय तो घोड्याच्या रक्तलसीचे संवेदीकरण करु शकतो. याऐवजी घटसर्पाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना घटसर्प लसीची मात्रा (अधिशोषित घटसर्प लसीची मात्र पीटीएपी) किंवा अधिशोषित घटसर्प - घनुर्वात लसीची 0.5 मिलीलिटर मात्रा देणे योग्य ठरेल (डीटी लस पीटीएपी वर अधिशोषित, ही लस घटसर्प आणि धनुर्वात अशा दोन्ही आजारा पासुन रक्षण करते) आणि 1 ते 2 महिन्यानंतर दुसरी लस दिली जाते. घटसर्प लसीचा अनेक वर्ष प्रतिबंधक म्हणुन अनेक वर्षे वापर करण्यात आला आणि ही क्रियेपासुन जवळजवळ मुक्त आहे.

उपचारातीरल वापर : घटसर्प विष प्रतिकाराची 10,000 ते 30,000 आंतरराष्ट्रीय एकके एवढी मात्रा स्नायुअंतर्गत पध्दतीने दिली जाऊ शकते, जेव्हा घटसर्प सौम्य ते मध्यम प्रमाणात असतो आणि रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर रक्तजलाची चाचणी घेतल्यानंतर कमाल 1,00,000 आंतरराष्ट्रीय एकके एवढी मात्रा दिली जाते (घोड्याच्या रक्तजलावरील प्रतिक्रिया खाली पहा). याशिवाय प्रतिजैविके आणि कॉर्टिकोस्टिरॉईडस देखील दिले जाऊ शकतात. असा सल्ला दिला जातो की घटसर्पानंतर पूर्वावस्थालाभ प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचे दिर्घकाळासाठी सक्रिय प्रतिक्षमत्व करणे आवश्यक आहे, त्यासाठी 1 ते 2 महिन्याच्या अंतराने दान्े ा मात्रा दिल्या जातात, यासाठी अधिशोषित घटसर्प लसीचा किंवा घटसर्प - धनुर्वात लसीचा वापर केला जातो.

घोड्याच्या रक्तजलावरील प्रतिक्रिया :

1) या पुर्वी रुग्णाला कोणत्याही रक्तलसीचे इंजेक्शन दिले होते काय,
2) वैयक्तिक किंवा कौटुंबीक अॅलर्जीचा इतिहास आहे काय, म्हणजेच दमा, इसब किंवा औषधाची अॅलर्जी आहे काय. 1 : 10 या प्रमाणात विरलन केलेले 0.1 मिलीलिटर घटसर्प विष प्रतिकारक देऊन रुग्णाची रक्तलसीची निगडीत संविदितेची चाचणी घेतली जाते आणि रुग्णाचे 30 मिनीट निरिक्षण केले जाते, या निरिक्षणात स्थानिक आणि सर्वसाधारण प्रतिक्रिया उदभवल्या काय हे बघितले जाते. जर चाचणी मात्रेमुळे गांध आणि लाली या साऱख्या स्थानिक प्रतिक्रिया उदभवल्या किंवा त्वचेचा फिकट रंग, घाम येणे, मळमळ, उलट्या, शीत पित्त किंवा रक्तदाब कमी करणे यासाऱख्या सर्वसाधारण अपप्रतिरक्षी प्रतिक्रिया उदभवल्या तर रुग्णाला 1 :1000 या प्रमाणात विरलन केलेले 0.1 मिलीलिटर अॅड्रेनॅलीन द्यावे (ते नेहमी सहज सापडेल असे ठेवणे) आणि ते घटसर्प प्रतिकारकारची मुख्य मात्रा देण्यापुर्वीच द्यावे. अॅड्रेनॅलीनची अर्धी मात्रा 15 मिनिटानंतर पुन्हा दिली जाऊ शकते - जर आवश्यकता असेल तर. अॅलर्जी असलेल्या रुग्णात इंजेक्शनद्वारे देण्यात येऊ शकणारे अँटीस्टीन (100 मिलीग्रॅम) आणि इंजेक्शनद्वारे देण्यात येऊ शकणारे हायड्रोकोरटीझोन (100 मिलीग्रॅम) यासारखे प्रतिहिस्टॅमाइन्स स्नायुअंतर्गत पध्दतीने दिल्यानंतर 15 ते 30 मिनिटांनी घटसर्प विषप्रतिबंधक द्यावयाचे आहे. ज्यावेळी प्रतिरक्तलस दिली जाते त्याचवेळी स्नायुअंतर्गत पध्दतीने 1 मिलीलिटर अॅड्रेनॅलीन (1 :1000) दिले जाऊ शकते. जर आवश्यकता असेल तर हायड्रोकोरटीझोन किंवा अॅड्रेनॅलीन पुन्हा दिले जाऊ शकते. काही रुग्णामध्ये खाज, पित्ताचे पुरळ, सांधे आणि स्नायुतील वेदना, लसीका ग्रंथीचा आकार वाढणे यासारखी लक्षणे घटसर्प विष प्रतिकारक दिल्यानंतर 7 ते 12 दिवसांनी दिसु शकतात. त्याच्यावर प्रतिहिस्टमाईन्स आणि कॅरटीकोसाईडस यांच्या साह्याने उपचार केले जातात. सर्वसाधारणपणे रक्तलसीचे हे विकार काही दिवस टिकतात आणि रुग्णांना कोणत्याही गुंतागुंती शिवाय पुर्वावस्थालाभ प्राप्त होतो.

 

वेष्टन :

घटसर्प विष प्रतिकारक
  • 10,000 आंतरराष्ट्रीय एकके 10 मिलीलिटर कुपिकेमध्ये.
  • 10,000 आंतरराष्ट्रीय एकके 5 मिलीलिटर कुपिकेमध्ये.
घटसर्प लस