हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.)
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम

एकसंयुजी 1 प्रकारची मौखिक घेण्याची पोलिओ लस

एक संयुजी मौखिक पोलिओ लस आयपी
प्रत्येक बाटलीत 2 मिलीलिटरचा समावेश आहे.
(20मात्रा) 1 एम MgCl2 समवेत स्थिरिकरण केले.
प्रत्येक मात्रा 2 थेंब (0.1 मिलीलिटर) मध्ये पोलीओ विषाणुचा (सॅबीन) समावेश आहे.
प्रकार 1 - 106 सीसीआयडी 50

एकसंयुजी प्रकार 1 मौखिक पोलिओ लस (एमओपीव्ही 1)

वर्णन
लसीचा समावेश असलेला कुपीचा मॉनीटर पाहुन त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा.
  
 
जीवंत, एकसंयुजी प्रकार 1 मौखिक पोलीओ लस म्हणजे स्वच्छ पारदर्शक पिवळसर नारींगी किंवा फिकट गुलाबी रंगाचे द्रावण आहे. ती एकसंयुजी लस असुन त्यामध्ये प्रकार 1 दुर्बलित पोलीओ विषाणुचा (सॅबीन प्रमेद) मिश्रणाचा (सस्पेनशनचा) समावेश आहे, सदर विषाणुची माकडाच्या मुत्रपिंडाच्या पेशी संवर्धात वाढ होते. (पी. एम. के. सी. सी). 2 थेंबांच्या प्रत्येक मात्रेत (0.1 मिलीलिटर) किमान पोलीओ विषाणु (सॅबीन) प्रकार 1 - 106 सीसीआयडी 50 चा समावेश आहे. मिश्रणाचे (सस्पेन्शनचे) जे प्रमाण 50% पेशींना संक्रमित करते त्या प्रमाणात मोजली जाते). पोलीओ विषाणु हॅक्स - संतुलित क्षारात सोडला जातो, त्यामध्ये स्थिरिकरण करणारा कारक म्हणुन 1 मोलर मॅग्नेशीयम क्लोराइडचा समावेश असतो आणि PH निर्देशक म्हणुन फेनॉल रेडचा समावेश असतो. एमओपीव्ही 1 मध्ये अगदी थोड्या प्रमाणात एरीथ्रोमायसीन आणि कॅनामायसीनचा समावेश असु शकतो. लस एकसंयुजी प्रकार 1 मौखिक पोलीओ लसीच्या जागतीक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करते.
 
एकसंयुजी प्रकार 1 मौखिक पोलीओ लस 0-5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूरक प्रतिक्षमनासाठी निर्देशित केली जाते. उर्वरित पोलीओ होऊ शकणाज्या क्षेत्रात प्रकार 1 पोलीओ विषाणुचे संक्रमण थांबवणे हे सदर लसीच्या निर्देशनाचे उद्दीष्ट आहे. राष्ट्रीय धोरणानुसार नेहमीच्या लसीकरण कार्यक्रमासाठी त्रिसंयुजी लसीचा वापर पुढे चालु ठेवणे आवश्यक आहे.
लस देण्याची पध्दत
एमओपीव्ही 1 लस मुखद्वारा देणे आवश्यक आहे. बहुमात्रा कुपीतुन ड्रॉपरच्या साह्याने लसीचे 2 थेंब थेट तोंडात टाकले जातात. मोठ्या मुलांना संभाव्य कडु चव टाळण्यासाठी लसीचे थेंब सर्व प्रथम साखरेच्या गठळीवर किंवा सिरपमध्ये ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. लसीचा बहुमात्रा ड्रॉपर लस घेणाऱ्याच्या लाळे मुळे दुषित होणार नाही याची खबरदारी घेतली जावी. अतिमात्रा , जर असेल तर, विपरीत परिणाम घडवणार नाही.

एकदा बहुमात्रा कुपी उघडल्यानंतर त्या +2 ते + 8 डिग्री सेल्सीएस तपमानात ठेवणे आवश्यक आहे. प्रतिक्षमन सत्रादरम्यान एमओपीव्ही 1 बहुमात्रा कुपीतुन काढलेल्या एक किंवा अनेक मात्रा कमाल चार आठवड्या पर्यंत नंतरच्या प्रतिक्षमन सत्रात वापरल्या जाऊ शकतात. मात्र त्यासाठी पुढील सर्व अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे, या अटी जागतीक आरोग्य संघटनेच्या पुढील धोरण विधानात विषद करण्यात आल्या आहेत : उघडलेल्या बहुमात्रा कुपींचा पुढील प्रतिक्षमन सत्रात वापर डब्ल्युएचओ / व्ही आणि बी / 00.09): :

  • मुदत समाप्ति दिनांक पार केला नाही ;
  • लसी थंड साखळी स्थितीत योग्य प्रकारे साठवल्या आहेत;
  • लसीच्या कुपीचे घ्सेप्टमङ पाण्यात बुडवले नाही;
  • सर्व लसी बाहेर काढण्यासाठी अपूतिक तंत्राचा वापर केला.
  • लसीचा समावेश असलेल्या कुपीचा तपमान मॉनीटर, जर तो जोडला असेल तर,लस टाकुन द्या बिंदुपर्यंत पोहोचला नाही (आकृती पहा) पहिल्या वेळेस कुपी उघडल्यानंतर ताबडतोब वापर करण्याची शिफारस केली जाते.
क्रिया आणि वापर

एक संयुजी प्रकार 1 पोलिओ लस (एमओपीव्ही 1 ) रोगाची काणतीही अनपेक्षित लक्षणे निर्माण न करता नैसर्गिक संक्रमण कृत्रीमरित्या निर्माण करण्याच्या मार्गाने शरिरातील सक्रिय प्रतिक्षमतेला चालना देण्यासाठी दिली जाते. आतड्याच्या मार्गात लसीच्या विषाणुची वाढ करुन हे साध्य केले जाते.

आनुषंगिक परिणाम

बहुसंख्य मुलांमध्ये त्रिसंयुजी मौखिक पोलिओ लस दिल्यानंतर आनुषंगिक परिणाम आढळले नाही, या लसीत ओपीव्ही 1 घटकाचा देखील समावेश आहे. अगदी क्वचीत लसीशी निगडीत अंगघात होऊ शकतो (10 लाख मात्रा दिल्यानंतर अगदी एखाद्या व्यक्तीला (मुलाला) हा आजार होऊ शकतो.

वापरासाठी विशेष इशारे आणि खबरदारी
जर अतिसार किंवा उलटी झाली (त्यामध्ये पोटाच्या आणि आतड्याच्या संक्रमक आजारांचा समावेश आहे) तर प्राप्त झालेली मात्रा नियमीत प्रतिक्षमन कार्यक्रमाचा भाग म्हणुन मानली जाणार नाही आणि रुग्णाला पूर्ववस्थालाभ झाल्यानंतर सदर मात्रा पुन्हा दिली जाईल. एमओपीव्ही 1 लस नियमीत प्रतिक्षमनासाठी वापरली जाऊ नये.
प्रतिषेध

आजारी मुलाला एमओपीव्ही 1 लस दिल्यास त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत.

प्रतिक्षम कमतरता

लक्षणानुसारी आणि अलक्षणानुसारी कारणामुळे मानवी प्रतिक्षम कमतरता विषाणु (एचआयव्ही) चे संक्रमण झालेल्या व्यक्तींना एमओपीव्ही 1 लसीची मात्रा प्रमाणित वेळापत्रकाप्रमाणे देणे आवश्यक आहे. तथापी ज्या व्यक्ती मध्ये प्राथमीक प्रतिक्षम कमकरता असेल किंवा दमन झालेला प्रतिक्षम प्रतिसाद असेल, असा प्रतिसाद श्वेतपेशी कर्करोग, लसीकापेशी अर्बुद (कर्करोग) किंवा सर्वसाधारण कर्करोग यामुळे निर्माण होऊ शकतो, तर सदर लस प्रतिवेध आहे (म्हणजे ही लस दिली जाऊ नये).

साठवण
जर लस - 20 डिग्री सेल्सीएस तपमानांखाली साठवली तर तिची क्षमता कुपीवर निर्देशीत केलेल्या मुदत-समाप्ती तारखेपर्यंत म्हणजेच ती उत्पादित केल्याच्या तारखेपासुन 2 वर्षापर्यंत कायम रहाते.